जिल्हा इंग्लिश टिचर्स असो.च्या संचालकपदी शंकर भामेरे

0

पहूर – महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इंग्रजी विषय शिक्षक तथा जामनेर तालुका चेस प्रोजेक्ट मेन्टॉर शंकर रंगनाथ भामेरे यांची जळगांव जिल्हा इंग्लिश असोशिएशनच्या कार्यकारी मंडळावर संचालकपदी निवड झाली . त्याबद्दल त्यांचा असोसिएशनच्या बैठकीत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी भरत शिरसाठ, प्रमोद आठवले, गणेश बच्छाव, एम.आर.चौधरी, टी.बी. पांढरे, बी.एन. पाटील, गणेश सुर्यवंशी आदींची उपस्थिती होती. श्री. भामेरे यांच्या निवडीबद्द्ल शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापिका के.ए. बनकर, एम.एच. बारी, ए.ए. पाटील, पी.आर. वानखेडे, एच.बी. राऊत, बी.एन. जाधव, सी.एच. सागर, आर.जे. चौधरी, संजय बनसोडे, सुनिल पवार आदींची उपस्थिती होती.