जिल्हा उपरुग्णालयात शिवसेनेचे आंदोलन

0

मुक्ताईनगर । येथील जिल्हा उपरुग्णालयात विष प्राशन केलेल्या रुग्णास 7.30 वाजता दाखल केल्यानंतरही रात्री 9.45 पर्यंत कोणतेही उपचार न केल्याच्या निषेधार्थ जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दालनातच आंदोलन करत संताप व्यक्त केला. तालुक्यातील महालखेडा येथील संदीप मोहन पाटील यांनी विषप्राशन केल्यामुळे नातेवाईकांनी उपचारासाठी मुक्ताइनगर तालुक्यात जिल्हा उपरुग्णालयात दाखल केल्यानंतर तब्बल दीड तास उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नव्हते तर कर्मचार्‍यांनी देखील कोणताही प्रतिसाद न दिला नाही.

अधिकार्‍यांची केली कानउघाडणी
शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना या घटनेबाबात माहिती पडताच त्यांनी उपरुग्णालयात येऊन संताप व्यक्त करत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दालनातच आंदोलन केले. तसेच डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल त्यांची कानउघाडणी केली. याप्रसंगी शहरातील डॉ. राहुल ठाकोर डॉ. प्रदीप पाटील, डॉ. योगेश पाटील यांनी येऊन उपचार केले. याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी नाशिकच्या वैद्यकीय उपसंचालक घाडगे यांचेशी चर्चा करुन तक्रार केली. याप्रसंगी तालुका प्रमुख छोटू भोई, सुनील पाटील, अफसर खान, राजू तळेले, बाळा भालशंकर, प्रवीण चौधरी, शुभम तळेले, चेतन पाटील, वसंत भलभले, प्रमोद भारंबे, वैभव तळेले व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.