नंदुरबार । जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दि,9 एप्रिल रोजी नंदुरबार शहरातील हुतात्मा उद्यानात एकदिवसीय उपोषण करण्यात आले. देशात कायदा व सुव्यवस्था बिघडलीअसून सामाजिक सलोखा खराब होत चालला आहे, भाजप शासनाच्या या नाकर्तेपणा च्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने दि,9 एप्रिल रोजी एक दिवसीय उपोषण करण्यात आले.
यांनी घेतला सहभाग
नंदूरबार येथील हुतात्मा उद्यानाजवळ सोमवारी सकाळी 10 वाजता उपोषण सुरू झाले. याचे नेतृत्व आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी केले. त्यात माजी केंद्रीय राज्य मंत्री माणिकराव गावित,आ. के.सी.पाडवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी अध्यक्ष भरत गावित, नगराध्यक्ष रत्नाताई रघुवंशी, भरत पटेल, रमेश गावित, रवींद्र मराठे आदी सहभागी झाले होते. या आंदोलनात काँग्रेस च्या सर्व विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.