स्वतःच्या गळ्यावर, हातावर वार केले वार ; कैद्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार
जळगाव ;- फसवणुकीच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बॅरेक क्रमांक 10 मध्ये असलेल्या असलेल्या निशांत तेजकुमार कोल्हे वय 21 रा.रामानंद नगर या कैद्याने मानसिक ताणतणावातून स्वतःच्या गळ्यावर आणि डाव्या हाताच्या नसावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. आरोपीला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचारानंतर कारागृहात आणण्यात आल. या घटनेने खळबळ उडाली असून जिल्हा कारागृहाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि निशांत तेजकुमार कोल्हे हा गेल्या 22 एप्रिल 2019 पासून तो कारागृहात 420 च्या गुन्ह्यात अटक असून कारागृहात आहे . त्याने सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटाला गळ्यावर उजव्या व डाव्या बाजूला आणि डाव्या हाताच्या नसांवर कुठल्यातरी धारदार वस्तूने स्वतःच्या गळ्याला आणि हाताला मारून दुखापत करून जखमी केले . या अचानक झालेल्या घटनेमुळे कैदी आणि कारागृह पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती . निशांत कोल्हेला लगेच जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता त्याच्यावर डॉ. प्रवीण पाटील यांनी उपचार केले . तसेच सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास तो कारागृहात परतला . कारागृह अधीक्षक अनिल वांधेकर यांच्याशी संपर्क साधला असता कैदी निशांत कोल्हे हा त्याच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांमुळे आणि घरगुती कारणामुळे मानसिक तणावातून त्याने स्वतःवर वार केल्याचे वांधेकर यांनी बोलताना सांगितले. जिल्हापेठला यासंदर्भात उशिरापर्यंत कुठलीच नोंद करण्यात आली नव्हती.