जिल्हा कारागृहास शुद्ध पिण्याचे पाणी, 500 पुस्तके

0

जळगाव । जिल्हा कारागृहातील बंद्याना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे तसेच त्यांना वाचनाची आवाड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दोन वॉटर प्युरीफायर व 500 पुस्तके देण्यात येतील. यासाठी आवश्यक तो प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा दंडाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्हा कारागृह प्रशासनास दिले.

जिल्हा कारागृह अभिविक्षक मंडळाची तिमाही सभा येथील कारागृहात जिल्हा दंडाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस. चव्हाण, उप विभागीय पोलीस अधिकारी रशीद तडवी, कारागृह अधिक्षक सुनील कुंवर, डॉ.विजय दर्जी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा कारागृतहा बंदीची संख्या बघता आवश्यक असलेल्या सुविधा कमी पडत असून त्यात लवकर सुधारणा करण्यासाठी संपुर्ण कारागृहाची माहिती मागविण्यात आली होती. ंद्यांना देण्यात येणार्‍या जेवणासाठी वापरण्यात येणारे कडधान्य व भाजीपाल्याची पाहणी करून त्यांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी उपक्रम राबवित आहे.

जिल्हा वार्षिक योजनेतून मिळणार सुविधा
कारागृहातील बंद्यांना देण्यात येणारे जेवणे चांगल्या पध्दतीचे असावे. त्यांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात. कारागृहाची तसेच कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती आदिबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली वैद्यकीय अधिकार्‍यांनी दररोज कारागृहास भेट देऊन बंद्यांची तपासणी करावी. तसेच महिला बंदीची संख्या लक्षात घेता दर आठवडयाला महिला वैद्यकीय अधिकार्‍यांने कारागृहास भेट देऊन तपासणी करण्याच्या सुचना जिल्हा दंडाधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्यात. त्याचबरोबर बंद्यांना देण्यात येणारे जेवण हे उत्कृष्ट प्रतीचे असावे. समिती सदस्यांनी महिन्यातून एकदा कारागृहास भेट देऊन जेवणाचा दर्जा तपासण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर बंद्यांना देण्यात येणार्‍या जेवणासाठी वापरण्यात येणारे कडधान्य व भाजीपाल्याची पाहणी केली. कारागृहात सामुहिक प्रार्थना व्हावी. बंद्यांसाठी व्यायामशाळेची मागणी करण्याच्या सुचनाही त्यांनी कारागृह प्रशासनास दिल्या.