जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे पंतप्रधानांना पत्र

0

जळगाव । जळगाव फर्स्टच्या 10 हजार पत्रांचे अभियानास 1 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. यावेळी दररोज चारशे ते पाचशे पत्र रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांना पाठविण्यात येते.

दरम्यान, मंगळवारी जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे पत्र पोस्ट करण्यात आली. आजही जऴगावातून जाणार्‍या महामार्गाचे चौपदरीकरण, समांतर रस्त्यांचे काम तातडीने व्हावे या मागणीची पत्रे पंतप्रधान व गडकरी यांना जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या पदाधिकार्‍यांकडून पोस्ट करण्यात आली. आतापर्यंत दहा हजार 700 जळगावकरांचे पत्रे संकलित झाली असून त्यापैकी 6 हजार 470 पत्र पाठविण्यात आली आहे. पत्र पोस्ट करतांना केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनिल भंगाळे, सचिव अनिल झवर, शामकांत वाणी, ब्रिजेश जैन, महेश महाजन, संजय तिवारी, राजेंद्र पाटील, विलास बरडे, इरफान सालार, लखीचंद जैन, काफिल शेख, सुयश जाधव आदी उपस्थित होते.