जिल्हा क्रीडा महासंघातर्फे अजित पवार यांचा सत्कार

0

जळगाव । महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुनश्‍च बिनविरोध निवड झाल्याबद्दल आ.अजितदादा पवार यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देवून जिल्हा क्रीडा महासंघातर्फे सत्कार करण्यात आला. विविध क्रीडा संघटनांना महाराष्ट्र ऑलिम्पिकची संलग्नता अजितदादांनी दिल्याने त्या संघटनेचे खेळाडू महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यात 5% आरक्षण अंतर्गत रुजू होवू शकेल.

यांची होती उपस्थिती
जिल्हा महासंघाचे सचिव डॉ.प्रदीप तळवेलकर, कबड्डी संघटनेचे नगरसेवक नितीन बरडे, नेट बॉल संघटनेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, मोटेक्स बॉल क्रिकेटचे निलेश पाटील, भाजपा क्रीडा आघाडीचे राजू खेडकर, सुपर सेव्हन क्रिकेटचे अरुण श्रीखंडे, शंकर मोरे, व्हॉलीबॉल संघटनेचे दीपक आर्डे, अांतरराष्ट्रीय खेळाडू सुमेध तळवेलकर, सई जोशी, रसिका रत्नपारखी, गौरव चौधरी, पवन म्हस्के, कुणाल येवले व इतर खेळाडू उपस्थित होते.