नाईस चॅलेंजरने पहिल्याच दिवशी विक्रमी 102 धावसंख्या ः डी.जे.वरील संगीताच्या तालावर खेळाडूंचा जल्लोष ः नागरिकांची पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी
जळगाव- जिल्हा डिलर्स असोसिएशनच्या विभागीय क्रिकेट स्पर्धेला शनिवारी सकाळी 7 वाजता सागरपार्कवर मैदानावर जल्लोषात सुरुवात झाली. जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून 10 संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदिवला आहे. आंतराष्ट्रीय दर्जाच्या आयपीएल सामन्यांप्रमाणेच सागरपार्कवरील वातावरण असून नागरिकांनी सामने पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केली होती. तसेच दुचाकी, चारचाकी लावून वेळात-वेळ काढून मैदानावर येवून खेळ बघणार्यांची संख्या खूप जास्त होती. व तसेच यु -ट्युबच्या या द्कश्राव्यमाध्यमातून 30 हजारावर दर्शकांनी सामन्यांचा आनंद लुटला.
येथील जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डिलर्स असोसिएशनतर्फे 8 व 9 डिसेंबर रोजी विभागीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा कॉम्प्युटर डिलर्स असोसिएशनच्या पदाधिकारी , सदस्य व सर्व संघाच्या खेळाडूंच्या उपस्थितीत औपचारीक रित्या उद्घाटन झाले. यानंतर राष्ट्रगीताने स्पर्धेला सुरुवात झाली. राष्ट्रगीतावेळी विविध रंगाचे आकर्षक ड्रेस घातलेल्या गोलाकर उभ्या खेळाडूंनी रस्त्या-वरुन ये-जा करणार्यांचे लक्ष वेधले होते. दिवसभरात दहा सामने झाले. चुरस, प्रेक्षकांची गर्दी तसेच षटकार,चौकार व विकेटनंतर डी.जे.वरील धमाकेदार हिंदी, मराठी संगीताने खेळाडूंमध्ये अनोखा उत्साह संचारला होता. काही संघातील खेळाडूंच्या कुटुंबियांनी मैदानावर प्रत्यक्षरित्या उपस्थित राहून क्रिकेटपटूंचा उत्साह द्विगुणीत करुन पहिल्या दिवशीच्या खेळाचा मममुराद आनंद लुटला.
पहिल्याच सामन्यात नाईस चॅलेंजरची बाजी
उद्घाटनंतर नाईस चॅम्पियन व आयबॉल इंडिया या संघामध्ये पहिलाच सामना झाला. यात आयबॉलने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारुन नाईस ला फलंदाजीसाठी आवाहन केले. नाईसने 7 षटकात 80 धावांचा पाऊस पाडला. व या प्रतिउत्तर देताना आयबॉल चा संघ अवघ्या 55 धावा करु शकला. आयबॉलचे खेळाडून रोहित व समाधान यांची एकाकी झुंज अपयशी ठरली. 25 धावांनी नाईसने हा सामना जिंकत स्पर्धेत धमाकेदार आघाडी घेतली. विशालने तीन विकेट घेवून आयबॉलचे मनसुबे हाणून पाडले.
पाचव्या षटकातच वॉर्डवीज वॉरियर्सचा विजय
दुसरा सामना वॉर्डवीज वारियर्स आणि न्यु ट्रॅक इंडियन या संघामध्ये झाला. यात न्यु ट्रॅकने आधी फलंदाजी करत 7 षटकात 41 धावाच केल्या. हे लक्ष्य वाईल्ड वॉरियर्स अवघ्या 5 व्या षटकात मिळवून 7 विकेटने विजय नोंदविला. न्यु ट्रॅक कडून राहूलने 22 चेंडूत 25 धावा काढल्या तर वॉर्डवीज वॉरियर्सकडून राहूलने 11 चेंडूत 15 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
9 गडी राखून बौना ब्लास्टर्सचा विजयी
मार्ग योध्दा व बौना ब्लास्टर्समध्ये झालेल्या तिसरा सामना झाला. यात मार्ग ने 6 विकेट गमावून 41 धावा केल्या. त्या प्रति÷उत्तरात 9 गडी राखून बौना ब्लास्टर्सने सहजरित्या विजय मिळविला. यात उमेशने 7 बॉलमध्ये 16 धावा करुन सर्वांचे लक्ष वेधले.
राजरायडर्सची दोन सामन्यात बाजी
राज रायडर्स व कॅनान चॅम्पियनमध्ये चौथा सामना चुरशीचा झाला. यात कॅनानने केलेल्या 70 धावांचे लक्ष राज रायडर्सने 8 गडी राखून सहज पार करुन विजय नोंदविला. यात राज रायडर्सकडून राजीवने 17 चेंडूत 32 धावांची फटकेबाजी केली. तर 11 चेंडूत 24 धावा करुन अदनानने विजय मिळवून दिला. तसेच दिवसाच्या शेवटच्या सामन्यात वर्डविजविरोधातच्या सामन्यात विजय नोंदवित स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला.
आय बॉलचा चुरशीच्या सामन्यात विजय
स्पर्धेतील पाचवा सामना आयबॉल इंडियन व शुभम टायगर्समध्ये झाला. चुरशीच्या सामन्यात शुभम टायगर्सच्या 80 धावांचा पाठलाग करत आयबॉलने 5 गडी राखून विजय मिळविला. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला. यात भावहिन याने 8 चेंडूत 5 षटकारांची आतिषबाजी करत 31 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
बिमपॅथरने उघडले विजयाचे खाते
न्युट्रॅक व बीम पँथरमध्ये झालेल्या सामन्यात न्यु ट्रॅकने नाणेफेक जिंकून बीमपँथरला फलंदाजीसाठी आवाहन केले. या संधीचा पुरपूर फायदा घेत पँथरने 73 धावा केल्या. या लक्ष्यासमोर न्युट्रॅकचा संघ 56 धावातच गारद झाला.
नाईस चॅलेंजरची 102 सर्वोच्च धावसंख्या
आजच्या स्पर्धेचे वैशिष्ट ठरले ते नाईस चॅलेंजरचा खेळाडू रोहित थोरातची फलंदाजी. मार्ग योध्दा व नाईस चॅलेंजरमध्ये सामना झाला. यात नाईस चॅलेंजरने रोहित थोरातच्या 6 षटकारांची आतीषबाजी करत 68 धावांच्या जोरावर आजच्या दिवसातील सर्वोच्च 102 अशी धावसंख्या उभारली. यात मार्ग केवळ 48 धावाच करु शकली. व नाईस चॅलेंजरने विजय मिळविला. शेवटच्या सामन्यात राजरायडर्सने
षटकारांची आतिषबाजी अन् नेत्रदिपक झेल
शनिवारी स्पर्धेत लक्ष वेधले रोहित थोरात यांच्या फलंदाजीसह अरबाज टकारी व प्राजळ घोलप यांनी पकडलेल्या नेत्रदिपक झेलांनी. यादरम्यान बौना टायगर्सचे कर्णधार यांनी वेळावेळी डी.जे.वरील संगीताच्या तालावर नृत्य करत सर्व उपस्थितांचे मनोरंजन केले.