जिल्हा दुध संघाचा निर्णय : गाय व म्हैस दूध खरेदी दरात भरीव वाढ

म्हैस दूध खरेदी दर रुपये ४९/- व गाय दूध खरेदी दर रुपये ३०/-

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाने दुध खरेदी दरात वाढ करुन दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे. याबाबत आज (दि. २५) झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत निर्णय घेण्यात आलेला आहे. 

या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार गायीच्या दुध खरेदी दरात ३.५/८.५ साठी प्रतिलिटर रु.३/- दरवाढ व म्हशीच्या दुध खरेदी दरात ७.०/९.० साठी प्रतिलिटर रु.२.४५ पैसे प्रति लिटर इतकी दि.१ मार्च, २०२२ पासून वाढ करण्यात आलेली आहे. तरी सर्व संस्थांनी दुध उत्पादक सभासदांना वाढीव दराबाबत माहिती द्यावी. जे सभासद इतरत्र दुध पुरवठा करीत असतील अशा सभासदांना वाढीव दराची माहिती देऊन संस्थेत दुध पुरवठा करणेस प्रवृत्त करावे असे आवाहन संघामार्फत करण्यात येत आहे. सद्यस्थितीत जळगांव जिल्हा दूध संघाचे प्रतिदिन २.२५ लाख लिटर्स दुध संकलन असून दुध खरेदी दर वाढीचा फायदा जिल्ह्यातील दुध उत्पादकांना होणार आहे.
जिल्हयातील सर्व प्राथमिक दूध संस्थांनी जळगांव दूध संघास जास्तीत जास्त दूध पुरवठा संघास करुन सहकार्य करावे असे आवाहन संघाचे चेअरमन मा.सौ.मंदाकिनी एकनाथराव खडसे व सर्व संचालक मंडळ यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. तसेच दि.१ मार्च, २०२२ पासून ग्राहकांसाठी गाय दुध विक्रीच्या दरात प्रति लिटर दुधासाठी रु.२/- इतकी वाढ करण्यात आली आहे. मात्र म्हैस दूधासाठी विक्री दरात वाढ करण्यात आलेली नाही.