जिल्हा दुध संघाची भरती प्रक्रिया बेकायदेशीर
स्थगिती देण्यासाठी एन.जे. पाटील यांची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
जळगाव – जळगाव जिल्हा सहकारी दुध संघातर्फे अधिकारी अणि तांत्रिक पदासाठीची भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेत कंत्राटी तत्वावर काम करणार्या ६३ जणांना नियमीत केले जाणार असुन त्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची तक्रार दुध संघाचा माजी कर्मचारी एन.जे. पाटील यांनी जिल्हाधिकार्यांकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. तसेच या भरती प्रक्रियेत आरक्षण कायद्याचाही भंग करण्यात येत असून ही भरती प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने त्यास तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणीही एन.जे. पाटील यांनी केली आहे.