MLA Mangesh Chavan As Chairman of District Milk Union : Khadse’s photo was deleted as soon as he assumed Office जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आक्रमकपणे भूमिका घेणारे चाळीसगावातील भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांचीच चेअरमनपदावर वर्णी लागेल, असे संकेत होते व संकेत आता खरे ठरले आहेत. रविवारी शेतकरी विकास पॅनलतर्फे आमदार चव्हाण यांनी अर्ज सादर केल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दरम्यान, आमदारांनी पदभार स्वीकारताच सुरूवातीलाच कॅबीनमधील माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा फोटो हटवल्याने यापुढे त्यांची भूमिका आणखीनच आक्रमक व कुणाविरोधात असेल ! हे स्पष्ट झाले आहे.
खडसेंचा फोटो हटवल्याने खळबळ
अध्यक्षपदी अधिकृत निवड झाल्याची घोषणा झाल्यानंतर मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी अध्यक्ष कॅबिनमध्ये असलेला एकनाथराव खडसे यांचा फोटो हटवण्यात आला. जळगाव जिल्हा दूध संघावर गेल्या सात वर्षांपासून खडसे यांचे एकहाती वर्चस्व होते मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत खडसे यांची सत्ता संपुष्टात आली.
खडसेंना बालेकिल्ल्यातच दिले आव्हान
कॅबीनमधील खडसे यांचा फोटो हटविण्यात आल्यामुळे पहिल्याच
दिवसापासून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपली अध्यक्षपदाची सुरुवात आक्रमकरित्या केल्याचे दिसून आले. आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला चाळीसगाव मतदार संघ सोडून थेट खडसे यांना त्यांच्या मुक्ताईनगर मतदार संघात आव्हान दिले होते. एवढेच नव्हे तर चांगल्या मतांनी विजय देखील संपादन केला.