District Milk Sangh Election: Farmers’ Panel Sarshi: Shock for Khadse; Know the winning candidates जळगाव : अत्यंत चुरशीसह प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत माजी मंत्री खडसेंना मोठा धक्का बसला असून शेतकरी पॅनलने 16 जागांवर दणदणीत विजय मिळवल तर दुसरीकडे खडसेंच्या सहकार पॅनलला अवघ्या चार जागांवर विजय मिळाला. राजकारणातील एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री खडसे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली तर विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे देखील ही निवडणूक चांगलीच गाजली.
19 जागांसाठी 39 उमेदवार रींगणात
जिल्हा दुध संघात आगामी पंचवार्षिक कालावधीसाठीची निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली आहे. यात एकूण 20 संचालकांची निवड करण्यात येणार असून यात पाचोरा तालुक्यातून माजी आमदार दिलीप वाघ हे आधीच बिनविरोध निवडून गेले आहेत. यामुळे 19 जागांसाठी 39 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी एकूण 441 मतदार असून जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर शनिवारी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला हक्क बजावला. या निवडणुकीचा आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर काही तासातच निकाल हाती आला.
खडसेंना धक्का : आमदार चव्हाण विजयी
या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला असून जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वात लक्षवेधी लढतीत मुक्ताईनगर मतदारसंघातून दूध संघाच्या मावळत्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांचा पराभव होवून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी 255 मते मिळवीत विजय झाले.
असे आहेत विजयी उमेदवार
मुक्ताईनगर मतदार संघ- आमदार मंगेश चव्हाण (एकूण मते 255), मंदाकिनी खडसे (एकूण मते 179)
जामनेर मतदार संघ- मंत्री गिरीश महाजन (एकूण मते 276), दिनेश पाटील (एकूण मते 158)
पारोळा मतदार संघ- आमदार चिमणराव पाटील (एकूण मते 227), सतीश अण्णा पाटील (एकूण मते 208)
रावेर मतदार संघ- जगदीश बढे (एकूण मते 170), ठकसेन पाटील (एकूण मते 266)
जळगाव मतदार संघ- मालती महाजन (एकूण मते 162), गुलाबराव पाटील (एकूण मते 275)
एरंडोल मतदार संघ- दगडू चौधरी (एकूण मते 230), अमर जैन (205)
भडगाव मतदार संघ- रावसाहेब भोसले (एकूण मते 233), डॉ. संजीव
पाटील (एकूण मते 200)
भुसावळ मतदार संघ- शामल झांबरे (एकूण मते 263), शालिनी ढाके (एकूण मते 169)
बोदवड मतदार संघ- अॅड.रवींद्रभैया पाटील ( एकूण मते 216), मधुकर राणे (एकूण मते 220)
चाळीसगाव मतदार संघ : प्रमोद पाटील ( एकूण मते 247), सुभाष पाटील (एकूण मते 188)
चोपडा मतदार संघ- इंदिराबाई पाटील (एकूण मते 164), रोहित निकम (एकूण मते 269)
धरणगाव मतदार संघ- वाल्मिक पाटील (एकूण मते 167), संजय पवार (एकूण मते 269)
अमळनेर मतदार संघ- आमदार अनिल पाटील (एकूण मते 246), स्मिता वाघ (एकूण मते 184)
यावल मतदार संघ- हेमराज चौधरी (एकूण मते 168), नितीन चौधरी (एकूण मते 260)
महिला राखीव मतदार संघ- छाया देवकर (235) पूनम प्रशांत पाटील (257), सुनीता राजेंद्र पाटील (एकूण मते 192), उषाबाई विश्वासराव पाटील (0), मनीषा अनंतराव सूर्यवंशी (164)
अनुसूचित जाती जमाती- श्रावण सदा ब्रम्हे (161), आमदार संजय वामन सावकारे (276)
वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. : विजय पाटील (एकूण मते 179), अरविंद देशमुख (एकूण मते 259)
इ.मा.व : गोपाळ भंगाळे (एकूण मते 207), पराग मोरे (एकूण मते 230)