जिल्हा नियोजन समितीची बैठक गुंडाळली

0

जळगाव । जिल्हा नियोजन मंडळाची कधीपासूनच प्रलंबित असणारी बैठक शनिवारी कशी तरी पार पडली. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील उशीरा आल्यामुळे बैठकही दीड तास उशीरा सुरू झाली. जिल्हा नियोजन बैठकीत आमदार एकनाथराव खडसे यांनी नाराजी व्यक्त केली.आजपर्यंत कोणताही निधी मिळाला नाही.हे बैठकीत बोलवून दाखविले.

जि.प.चे अधिकार महाजन, खडसेंना
नुकतीच जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुक पार पडली या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी एका जागेची आवश्यकता असल्याने भाजप कोणाची मदत घेणार याबाबत बैठक आटोपल्यानंतर पत्रखारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युतीबाबतचा निर्णय घेण्यासाठी ना. गिरीश महाजन व एकनाथराव खडसे समर्थ असून त्यांचा निर्णय अंतिम राहिल असे सांगितले.