जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी

0

जळगाव । जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली. जळगाव जिल्ह्याचा 2019-20 या आर्थिक वर्षाचा आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूरीबाबत पालकमंत्री या प्रस्तावावर मंजूरीचे निर्णय घेण्यात येणार आहे. याबैठकीत शहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही कार्यान्वित करणे, खलाणे येथील स्मारकाचे बांधकाम, वनविभाग, वीज कंपनी, शिक्षण, वाळूची रॉयल्टी, प्राथमिक आरोग्य केंद्र, घरकूल योजना, क्रीडा संकुल, ओपन जिम, अनुपालन अहवालाची पूर्तता आदी विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

2019-20 वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती मुंडके यांनी दिली. यात नवीण्यपूर्ण योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामविकास, पाटबंधारे व पूरनियंत्रण, उद्योग, परिवहन, सामान्य सेवा, सामान्य आर्थिक सेवा, कृषी विभाग, विजमंडळ आदीचा समावेश होणार आहे. नियोजन समितीची बैठकीबाबत जिल्हा महसूल विभागातील अधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, विद्यूत महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा रूग्णालय, जिल्हा पोलीस अधिकक्ष या विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे.