पुणे । जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांची मुदत संपत आली असून येत्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये सध्या सर्व आमदार खासदार विशेष निमंत्रीत म्हणून असतात तसेच शासननियुक्त 18 आणि राज्यपाल नियुक्त 2 अशा एकूण 60 जागा आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होत आली आहे. याही वेळी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीवर ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातील म्हणजेच जिल्हा परिषदेचे 75 मतदार असून त्यातून 17 जागा निवडून द्यायच्या आहेत. नगरपालिका क्षेत्रातून 391 मतदार असून त्यातून 2 जागा निवडून द्याव्या लागणार आहत. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातून 287 मतदार आहेत. त्यांच्यातून 21 जागा निवडून द्यायच्या आहेत. अशा एकूण 40 जागांसाठी हा निवडणूक कार्यक्रम असणार आहे. या जागा निवडताना नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, एससी, भटक्या विमुक्त जातीजमाती असे आरक्षण असणार आहे.