जिल्हा नियोजन समितीवर आमदार चंद्रकांत पाटील व आमदार शिरीष चौधरींची नियुक्ती

0

मुक्ताईनगर : विधीमंडळ सदस्यांमधून दोन व्यक्तींची जळगाव जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करण्यात आली. त्यात मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील व रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार शिरीष चौधरी यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे परीपत्रक मंगळवार, 26 मे रोजी महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी वनिता जाधव यांच्या डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित प्रमाणित करून निर्गमित करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवडीबद्दल सोशल मीडियात नागरिक , पदाधिकारी व शिवसैनिक तसेच महाविकास आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांची जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्याने शिवसेना शहर संघटक वसंत भलभले व नगरसेवक संतोष मराठे व सापधरे आदींनी त्यांचा सत्कार केला.