जिल्हा नियोजन समिती सदस्या वर्षा शिंदे यांचा सत्कार

0

एरंडोल । येथील एरंडोल नगर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वर्षा राजेंद्र शिंदे यांची नुकतीच जळगाव जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्यामुळे एरंडोल व पारोळ्याचे आमदार डॉ.सतिष पाटील यांनी सपत्नीक त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. नुकत्याच जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या निवडणुकीत एरंडोल येथून राष्ट्रवादीच्या नगरसेविका वर्षा राजेंद्र शिंदे यांची निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार तालुक्याचे आमदार डॉ.सतिष पाटील व त्यांच्या पत्नी रेखा पाटील यांनी वर्षा शिंदे यांच्या घरी जाऊन केला.

सत्कारप्रसंगी यांची उपस्थिती
याप्रसंगी आमदार डॉ.पाटील यांनी शिंदे दाम्पत्यांनी राष्ट्रवादी पक्षा सोबत एक निष्ठ राहून व पक्षात राहून वार्ड व शहरासाठी नियमित कामे केली व आमचा पक्ष हा नेहमी काम करणार्‍याला योग्य न्याय देतो. त्याचीच पावती वर्षां शिंदे यांना मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, अमित पाटील, नगरसेवक अभिजित पाटील, शेखर पाटील, रवींद्र पाटील यांनीही वर्षा शिंदे यांचा सत्कार केला. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र शिंदे, विजय पाटील, दत्तू पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.