जिल्हा न्यायालयात महिला दिन साजरा

0

जळगाव । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी जिल्हा न्यायालयात महिला दिन साजरा करण्यात आला.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. लव्हेकर यांच्या अध्यक्षतेखाली तर न्यायाधीश कविता अग्रवाल, न्यायाधीश एस. एस. पाखले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा प्राधीकरणाचे सचिव आर. एम. मिश्रा, वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण वाणी आदी उपस्थित होते.