जिल्हा पत्रकार संंघातर्फे माध्यमातील महिलांचा गौरव

0

जळगाव । जिल्हा पत्रकार संघातर्फे बेटी बचाव पेटी पढाव अभियानातंर्गत आज माध्यम क्षेत्रात काम करणार्‍या महिला व ज्या पत्रकारांना व माध्यम क्षेत्रातील महिलांना दोन किंवा एक कन्यारत्न आहे त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय बापू पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, डॉ. अस्मिता पाटील, आमदार सुरेश भोळे, स्मिता वाघ, महापौर नितीन लढ्ढा, ज्योती भोळे, दिलीप तिवारी उपस्थित होते.