अलिबाग । सरकारी कार्यालय, खासगी कार्यालय इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण ठेण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येते. मात्र जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कालबाह्य झाल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेतील अग्निशमन यंत्रणा ही 7 वर्षांपूर्वी बसवली आहे. मात्र ही अग्निशमन यंत्रणा बसवल्यापासून त्याची तपासणी झाली नाही. त्या आग नियंत्रक यंत्रावरची अंतिम तारीखही निघून गेलेली आहे. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडली तर या आग नियंत्रक सुविधेचा उपयोग होणार नाही. मात्र, याकडे जिल्हा परिषद प्रशासन व सत्ताधारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
जिल्हा परिषद इमारतीत साधारण 200 ते 300 कर्मचारी काम करीत असतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत अनेक नागरिक कामासाठी येत असतात. जिल्हा परिषद होत इमारतीमधील कार्यालयावर लाखोंचा खर्च करीत आहे. मात्र इमारतीच्या सुरक्षेबाबत मात्र कानाडोळा करताना दिसत आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याआधी प्रशासनाला जाग यावी, अशी अपेक्षा नागरिक व कर्मचारी करत आहेत. जिल्हा परिषदेची इमारत 40 वर्षापूर्वी बांधलेली आहे. ही इमारत 3 मजली असून टेरेसवर जिल्हा परिषदेची काही कार्यालये बांधलेली आहेत. इमारत बांधल्यानंतर या इमारतीत आगी सारखी घटना घडली तर त्यावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी अग्निशमन यंत्रणा इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बसवली आहे.
कार्यालयात लोकांची गर्दी
जिल्हा परिषद इमारतीत साधारण 200 ते 300 कर्मचारी काम करीत असतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदेत अनेक नागरिक कामासाठी येत असल्याने नेहमीच गर्दी असते. जिल्हा परिषद इमारतीमधील कार्यालयावर लाखोंचा खर्च करीत होत आहे. मात्र इमारतीच्या सुरक्षेबाबत मात्र कानाडोळा करताना दिसत आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडण्याआधी प्रशासनाला जाग यावी आणि यंत्रणा कायान्वित करावी, अशी मागणी नागरिक व कर्मचारी करत आहेत.