जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी आणून विकास साधणार

0

जळगाव। शहरी भागाच्या तुलनेने ग्रामिण विकास मागे राहणार नाही यासाठी आपले लक्ष असुन जास्तीचे विकास कामे ग्रामिण भागात करणार असुन यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती मधुनही निधी आणुन विकास साधणार असल्याचे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदार संघाच्या खा. रक्षाताई खडसे यांनी अडावद येथे केले.

अडावद येथे आज दि. 10 रोजी दुपारी खासदार निधीच्या मंजुर 21 लाख रुपयांच्या विवीध रस्त्याच्या कामाचे भुमीपुजन व उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्या व्यासपिठावरुन बोलत होत्या.

विविध रस्त्यांचे झाले भूमीपुजन
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील, प्रदिप पाटील, मुख्यमंत्री मित्र पप्पू पाटील, अडावदच्या सरपंच भारती महाजन, खर्डीच्या सरपंच दिपाली पाटील, रमेश पवार, हनुमंत महाजन, सचिन महाजन, मनोहर पाटील, प्रकाश पाटील, अरशद खान, श्रीकांत दहाड, राकेश पाटील, शे.ताहेर मन्यार,कालू मिस्तरी, डॉ. दिलीप अडावदकर, उमेश कासट, प्रदिप धनगर, शकीलोद्दीन शेख, तलाठी व्हि.डी.पाटील, पी.एल.बाविस्कर, मधुकर कासार, काशीनाथ महाजन, हरिष पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने आदी उपस्थिती होते.