जिल्हा परिषदेच्या योजनांचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा

0

जेजुरी । पुणे जिल्हा परिषदेच्या मनरेगा योजनेतील शौचालय, रस्त्यांचे मुरमीकरण, शेततळे, फळबागा, विहिरी अशा मालमत्ता निर्मिती योजनांचा लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा. कोथळे हे गाव स्मार्टग्राम निर्माण करावे, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी केले.बुधवारी (दि. 8) दौलत देसाई यांनी पुरंदर तालुक्यातील कोथळे या गावाला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या योजनेतील गायी गोठा प्रकल्पाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे, बांधकाम विभागाचे उपअभियंता सुधीर माने, मनरेगाचे गटविकास अधिकारी विकास दांगट, पुरंदरचे गट विकास अधिकारी कृष्णकांत वेणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त विकास कामांचे प्रस्ताव पाठवावेत. कोथळे धालेवाडी परिसरात नियोजन मंडळ व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आत्तापर्यंत कोट्यवधींची विकास कामे राबविण्यात आली असल्याचे यावेळी नियोजन मंडळाचे सदस्य प्रकाश भोईटे यांनी सांगितले. नीरा मार्केट कमेटीचे संचालक अ‍ॅड. धनंजय भोईटे, माजी उपसरपंच राहुल भोसले, ज्ञानेश्‍वर भोईटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.