पथराड येथील तक्रारींच्या चौकशीची मागणी
जळगाव- धरणगाव तालुक्यातील पथराड ग्रामपंचायतीसंदर्भातील विविध तक्रारींची तालुकास्तरावर दखल घेतली जात नसून उलट आपल्यालाच ग्रामसेवकाकडून धमकावले जात असल्याचे सांगत पथराड येथील मिथून साळूंके या तरूणाने जिल्हा परिषदेत अंगावर पेट्रोल ओतण्याचा प्रयत्न केला. अखेर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय म्हस्कर यांनी चौकशी समिती नेमण्यासंदर्भात आदेश काढण्याच्या सूचना देत यासंदर्भात आठ ते दहा दिवसात यासंदर्भात कारवाई होईल, असे आश्वासन दिले.
काय आहेत तक्रारी
मासिक सभेत बेकायदेशीर ठराव, एका महिला ग्रामपंचाय सदस्याने सरपंच असताना पदाचा राजिनामा न देता अंगणवाडी सेविकेचा पदभारही स्वीकारला यासंदर्भात कारवाई व्हावी, विहीर न खोदता विहिरीचे अनुदान मंजूर करणे, पानपट्टी व घरपट्टी वसूल करून ती बँकेत न भरणे, दप्तर उपलब्ध करून न देणे, सावंतसर शिवार रस्त्यात जेसीबीने काम करून मजूरांच्या नावावर पैसे मंजूर करणे.. यासह विविध तक्रारी तालुकास्तराव बीडिओ व ग्रामसेवकांकडे दिल्या. मात्र, ग्रामसेवक शरद सूर्यवंशी हे आपल्यालाच धमकावित असल्याचे मिथून साळूंके या तरूणाने अतिरिक्त मुख्यकार्यकरी अधिकारी म्हस्कर यांना सांगितले. तरूणाच्या तक्रारी ऐकून घेत तात्काळ यासंदर्भात चौकशी समिती नेमण्या संदर्भातील आदेश तयार करण्याच्या सूचना संजय म्हस्कर यांनी दिल्या. चौकशी समितीत विस्तार अधिकारी, यावल येथील अधिकारी तसेच एआरजीसचे अधिकारी व तांत्रिक अधिकारी यांचा या चौकशी समितीत समावेश असेल, यासह बिडिओंनी हलगर्जीपणा केला असल्यास त्यांच्यावरही कारवाई होईले, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, मिथून साळूंके याने 10 डिसेंबरपर्यतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र 7-8 डिसेंबरपर्यंत यासंदर्भातील कारवाई करू असे म्हस्कर यांनी आश्वासीत केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवि देशमुख यांची उपस्थिती होती.