जळगाव । जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्त्वपूर्ण अंग आहे. जिल्हा परिषद ग्रामीण भागाचे नेतृत्व करीत असते त्यामुळे या ठिकाणी नित्य येणार्यांची संख्या मोठी असते. जिल्हा परिषदेत येणार्या वाहनांची पार्कींग व्यवस्थित व्हावी तसेच वाहनांच्या सुरक्षेकरीता सुरक्षा रक्षक असावी अशी मागणी सातत्याने होत होती. नवनियुक्त मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पदभार घेतल्यानंतर लगेचच दुसर्या दिवशी जिल्हा परिषदेत सुरक्षा रक्षकांची नेमणुक केली आहे. या ठिकाणी 6 सुरक्षा रक्षकांची नेमणुक करण्यात आली आहे. जिल्ह्यात जिल्हा सुरक्षा मंडळाची नेमणुक करण्यात आली आहे. सुरक्षा रक्षक 24 तास जिल्हा परिषदेला सुरक्षा पुरविण्याचे काम करणार आहे.