जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकांचे रक्तदान

0

धुळे । जिल्हा सामान्य रुग्णालय धुळे येथे आय.सी.यु. मध्ये नंदुरबार तालुक्यातील भिमा भील नावाचे आदीवासी समाजाचा रुग्ण उपचारासाठी आले आहे त्याला – ए पॉझिटीव्ह गटाच्या रक्ताची नितांत गरज होती सदर गटाचे रक्त रुग्णालयात उपलब्ध नव्हते. याबाबत जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनाचे गटनेते व जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय साहाय्यक वनराज पाटील यांना कळल्यावर त्यांनी त्याठिकाणी जाऊन स्वयं प्रेरणेने रक्तदान केले यावेळी त्यांचे सोबत लामकनी ता. धुळे चे उपसरपंच धनंजय कुवर उपस्थित होते. श्री. पाटील यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारे रक्तदान केले आहे. तसेच असे उपक्रम राबविणेसाठी त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनास निवेदन देखील दिले आहे.