शिरपूर । ग्रामीण भागात आरोग्य संस्था व आशा स्वयंसेविका यांचे काम उत्कृष्ट आहे. त्यांच्या कामाबद्दल अजून एकदाही तक्रार प्राप्त झाली नाही. हे त्यांच्या कामाची पावतीच आहे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी केले. ते राष्ट्रीय आरोग्य अभियान, माहिती शिक्षण व संपर्क, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यामाने उत्कृष्ट आरोग्य संस्था यांना डॉ.आनंदीबाई जोशी, कायकल्प, प्रा.आ.केंद्र व प-लॉरेन्स, तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात
बोलत होते.
आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार : प्रथम – प्रा.आ. केंद्र बोराडी , द्वितीय – प्रा.आ.केंद्र छडवेल , तृतीय प्रा.आ.केंद्र आनंदखेडा , प्रथम – प्रा.आ उपकेंद्र आजंदे , द्वितीय – प्रा.आ.उपकेंद्र बाळापूर , तृतीय – प्रा.आ.उपकेंद्र उडाणे कार्याकल्प पुरस्कार : प्रथम- प्रा.आ.केंद्र कापडणे , द्वितीय – प्रा.आ.केंद्र उत्तेजनार्थ , प्रा.आ.केंद्र वकताड उत्तेजनार्थ , प्रा.आ.केंद्र बेटावद उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्र लॉरेन्स नाईटिगेल पुरस्कार ः ए.एन.एम – प्रथम संगीता पवार, द्वितीय मनिषा सोनवणे, तृतीय देवकी धुमेकर, आरोग्य सखी पुरस्कार – प्रथम संगीता चौधरी, द्वितीय सुनिता पाटील, खेद बु. सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार जिल्हास्तरीय – प्रथम धमणार आरोग्य केंद्र, अंजना वाघ, द्वितीय जैताने – रत्ना जाधव, तालुकास्तरीय आशा पुरस्कार – बोदकुड (धुळे) – सरला पाटील, तामकानी (धुळे) – भारती पाटील, छडवेल (साक्री) – जावत्रा शिंदे. यांना आशा जिवन गौरव पुरस्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.आर.व्ही.पाटील यांनी तर परिचय हर्षदा पवार यांनी केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, समाजकल्याण सभापती वंदना गुर्जर, आरोग्य सभापती नुतन पाटील, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती लिला बेडसे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी मा.शि.अर्जुन गुंडे, अॅड.चंद्रकांत येशीराव आदी
उपस्थित होते.