जिल्हा परिषद निवडणुका राष्ट्रवादी स्वबळावर लढणार

0

मुरबाड । मुरबाड तालुक्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे प्रतिपादन मुरबाडचे माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांनी नुकताच मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुरबाड येथे केले. नजीकच्या काळात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे यासाठी कार्यकर्त्यांची सभा आयोजित केली होती. मोदी सरकारचे नोटबंदी धोरण, शेतकरी कर्जमाफी, कॅशलेस व्यवहार कसे चुकले हे जनतेपर्यंत या होणार्‍या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत तसेच घराघरामध्ये पोहचवावे असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.

सेनेसोबत युतीचेही संकेत
वरिष्ठ पातळीवर शिवसेनेसोबत युती झाल्यास त्यावेळी जरूर विचार केला जाईल असेही पवार यांनी कार्यकर्त्यांना संकेत दिले. तसेच मुरबाड तालुक्यात जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण कसे पडले आहेत याबाबत राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रामभाऊ दळवी यांनी सविस्तर माहिती दिली. या सभेत माजी सभापती सुभाष पवार, वसंत गायकर, मधुकर मोहपे, प्रकाश पवार (सर) यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी पांडुरंग कोर, चिंतामण घोलप, वसंत गाडगे, लक्ष्मण भागात, माजी उपसभापती आंबो वाघ, भगवान भला, बाजार समितीचे सभापती रमाकांत सासे, परशुराम भोईर, संजय पवार, बाळकृष्ण चौधरी, अनिल देसले, दीपा भाला, भरती पष्टे यांच्यासह बाजार समितीचे सर्व संचालक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.