जिल्हा परिषद निवडणूक: महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी जयश्री अनिल पाटीलांनी घेतले अर्ज

0

जळगाव: जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची आज शुक्रवारी निवडणूक होत आहे. अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली असून महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीच्याजयश्री अनिल पाटील आणि शिवसेनेच्या रेखाबाई दीपक राजपूत या दोघांनी अर्ज घेतले आहे. तर उपाध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे मनोहर उर्फ रावसाहेब गिरधर पाटील आणि नानाभाऊ महाजन यांनी शिवसेनेकडून अर्ज घेतले.