एरंडोल । येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांच्या नुकत्याच शहरात बैठका संपन्न होऊन इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात आली. यात राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक एकच दिवशी घेण्यात आली. यात शिवसेनेने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील आपल्या पक्ष कार्यालयात बैठक घेतली असता त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चिमणराव पाटील हे होते. त्यांनी कार्यकर्त्यांना एरंडोल तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असुन त्याला मजबुत राखण्याचे काम तुमचे असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा प्रमुख गुलाब वाघ, विद्यमान झेडपी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा उपप्रमुख दशरथ महाजन, तालुकाध्यक्ष वासुदेव पाटील, शहरप्रमुख प्रसाद दंडवते आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत नानाभाऊ महाजन यांची उमेदवारी रिंगणगाव – विखरण गटातून जाहीर करण्यात आली.
मंडपात कार्यकर्त्यांपेक्षा मान्यवरांचीच भाऊ गर्दी
राष्ट्रवादी काँग्रेसने आपली बैठक गणेश नगर मधील आपल्या पक्ष कार्यालयात जेष्ठ व माजी पं.स.सभापती आनंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आमदार डॉ.सतीष पाटील हे बैठकीला वेळेवर पोहचले परंतु जवळ जवळ दीड तास बैठकीत कार्यकर्त्यांची वाट बघत बसले होते. तरीही दीड तासानंतरहि केवळ मंडपात कार्यकर्त्यांपेक्षा मान्यवरांचीच भाऊ गर्दी जास्त होती. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या एरंडोल न.पा.निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगरसेविका व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. आमदार डॉ. सतिश पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली. कार्यकर्त्यांना एक संघ राहण्यचा सल्ला दिला. बैठकीला तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले,विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ.सुभाष देशमुख, शहराध्यक्ष प्रा.मनोज पाटील, राजेंद्र शिंदे, रवींद्र पाटील, अभिजित पाटील, रव.अहमद सैयद, सुदाम पाटील आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल शहरातही झाल्या बैठका
यावल – यावल बाजार समिती सभागृहामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक ही पक्ष स्वबळावर लढविणार असे यावल राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी आमदार अरुणदादा पाटील व महिला जिल्हाध्यक्षा विजया पाटील यांनी सांगितले. यावेळी सभेमध्ये सर्व गट व गनातील इच्छुकांचे फॉर्म भरुन घेतले. सर्व गटामध्ये 3-4 फॉर्म इच्छुकांनी सर्व गणातून प्रत्येकी 7-8 इच्छुक होते. जास्तीत जास्त पंचायत समितीसाठी इच्छुकांनी गर्दी केली. या सभेसाठी जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा युवकांचे जिल्हाध्यक्ष योगेश देसले, सुक्राम पाटील, सिताराम पाटील, विजय पाटील, अनिल साठे, दिनु पाटील, निळकंठ फिरके, भागवत पाटील, शंकरराव मगरे, पिंटू राणे, शशांक देशपांडे, दिनकर पाटील, भागवत अस्वाल, गुलाब पाटील, मेहरबान तडवी, विनोद पाटील, ज्ञानेश्वर तायडे, फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, पप्पु चौधरी, दिपक काटे, भगवान बरडे, भैय्या पाटील, प्रशांत पाटील, गजू पाटील, शशिकांत पाटील, डी.के.पाटील, विकास पाटील, राज कोळी, निसार तडवी, रामकृष्ण पाटील, दिपक पाटील, अनिल कोळी, द्वारकाबाई पाटील, मंगला नेवे, वसंत पाटील, भास्कर पाटील, मनोहर महाजन यावेळी शहरातील युवकांनी पक्ष प्रवेश घेतले. आशुतोष पाटील, सागर कोळी व इतरांनी प्रवेश केला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी केले. सुत्रसंचालन देवकांत पाटील व शेवटी आभार प्रदर्शन बोदडे नाना यांनी मानले. तालुक्यातील बहुतांश इच्छुकांचे समर्थक उपस्थित होते.