जिल्हा परिषद शाळांना 10 टॅब्लेट वाटप

0

भुसावळ। प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये टॅब्लेटद्वारे शिक्षण हा नावीन्यपूर्ण उपक्रम भुसावळ तालुक्यात राबविला आहे. त्यानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेगावकर आणि शिक्षणाधिकारी पाटील यांच्या प्रेरणेने आणि शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या प्रयत्नांनी उज्वल एज्युुकेशन ट्रस्टतर्फे ‘लोकसहभाग’ अंतर्गत 10 टॅब्लेट प्राप्त झाले.

यांची होती उपस्थिती
टॅब्लेट देतांना ट्रस्टच्या अध्यक्षा अनघा गगडाणी, प्रवीण गगडाणी, मानसी गगडाणी, सीए खैरनार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी हे टॅब्लेट स्वीकारले.