शिरपूर। येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने सर्व शिक्षा अभियान योजनेचे सन 2016/17 या वर्षाच्या प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक चक्क रद्दी करून विक्री केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षी शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अभ्यासक्रमाची पुस्तके अली होती. दरम्यान शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले. मात्र अनेक विद्यार्थी हे शाळेत फक्त हजेरी बुकवर असल्यामुळे त्यांच्या वाटायची पुस्तक शिल्लक राहिले होते. दरम्यान आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत असल्यामुळे येथील शिक्षण विभागाने गेल्या वर्षाची शिल्लक पुस्तके चक्क भंगार बाजारात रद्दी करून विक्रीला काढली आहेत.
विद्यार्थी फक्त हजेरी बुकवर असल्याचा कारभार
दरम्यान या पुस्तक विक्रीसाठी शिक्षण विभागाने कोणतीही जाहिरात व निविदा काढली नसल्याचे सांगण्यात येत आहे. या कारस्थानाची खबर कोणाला लागू नये म्हणून 12 रोजी सायंकाळी गुपचूप एका टेम्पो रिक्षामध्ये पुस्तकाचे गाठोले भरून भंगार बाजारात रवाना करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील अधिकार्यांना विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली असून या पुस्तक विक्री ची माहिती वारिष्ठानादेखील नसल्याचे समोर येत आहे.