जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची सहाशे पदे रिक्त

0

जळगाव : जिल्ह्यासह राज्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील शिक्षकांचे पद गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त आहे. विद्यार्थ्याच्या प्रमाणात शिक्षक उलब्ध नसल्याने शिक्षकांवर अतिरिक्त भार शिक्षकांवर देण्यात आलेला आहे. अतिरिक्त कामामुळे शिक्षक विद्यार्थ्याना पुरेसा वेळ देऊ शकत शकत नाही त्यामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अपुर्‍या शिक्षकांमुळे शाळा वार्‍यावर आहे. जिल्ह्यात मराठी आणि उर्दु शाळेतील शिक्षकांच्या तब्बल 600 पदे रिक्त आहे. जिल्हा परिषदेतर्फे रिक्त पदांबाबत शासनस्तरावर अनेक वेळा पत्रव्यवहार झालेला आहे मात्र शासन काहीही उपाय करत नाही.

रिक्त पदे : शिक्षकांसोबतच मुख्याध्यापकांचे पद देखील रिक्त आहे. मुख्याध्यापक पदाच्या कमतरतेमुळे अनेक शाळांना कायम स्वरुपी मुख्याध्यापक नाही. जिल्ह्यात एकूण 250 प्रभारी मुख्याध्यापक कार्यरत आहे. तसेच केंद्रप्रमुखांचे 10, विस्तार अधिकारींचे 22, तर गटशिक्षणाधिकारी पदाच्या 10 पदे रिक्त आहे.

खाजगी शाळांची चांदी
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिक्षकाचे पद पुरेशा प्रमाणात नसल्याने शिक्षकांवर अतिरिक्त भार आलेला आहे. त्याचाच परिणाम म्हणून अतिरिक्त कामाचा बोज्यामुळे शिक्षकांच्या शिकविण्याच्या पध्दतीत बदल होत आहे. त्यामुळे पालकांनी मराठी शाळेकडे पाठ फिरविली आहे. त्यामानाने खाजगी शाळेतील शिक्षणपध्दती चांगली असल्याने विद्यार्थी संख्या वाढली आहे. खाजगी शाळेत अव्वाचे सव्वा फी घेतात तरीही पालक तो खर्च नाईलाजाने करीत असतो.

शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणावर परिणाम
शिक्षकांची संख्या जर विद्यार्थ्याच्या प्रमाणात असली तर विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ देता येईल मात्र पद रिक्त असल्याने उर्वरित शिक्षकांवर अतिरिक्त बोजा देण्यात आलेला आहे. अतिरिक्त पदाच्या भारामुळे विद्यार्थी दुर्लक्षित आहे. त्याचाच विपरित परिणाम शिक्षणावर होत आहे. शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे शिक्षणाची प्रत घसरत आहे. त्यामानाने खाजगी शाळेतील शिक्षणाचा दर्जा मराठी शाळेपेक्षा अधिक चांगले असल्याने खाजगी शाळेकडे ओढ
वाढली आहे. जिल्हा परिषदेमार्फत पद भरती संदर्भात शासनाकडे वारंवार मागणी केली जात आहे. परंतु ही समस्या कायम आहे.