चिंबळी । नन्ही कली या प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यातील मोई येथील इंदराजी माध्यमिक व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुलींना नुकतेच टॅबलेटचे वाटप करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक कैलास कानडे यांनी दिली.
नंदी फाउंडेशन यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला. सरपंच, उपसंरपच, सर्व सदस्य शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आदी मान्यवरांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले. सारिका कर्पे, रेशमा तापकीर, सोनाली कर्पे, आकांशा गवारे, सुवर्णा कर्पे आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.