जिल्हा परिषद शाळेत स्वच्छता पंधरवाडा

0

नवापूर । भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा अंतर्गत नेहरू युवा केंद्र नवापूर व हुतात्मा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात स्वच्छता पंधरवाडा व ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

यात नेहरू युवा केंद्र नवापूर तालुका स्वयंसेवक शिवशाहीर सुनिल पवार,डॉ आशुतोष वाडीले,डॉ राहुल सोनावणे,कल्पेश गोसावी,रजनीकांत वाडीले,राहुल वाडीले,कुणाल सोनार राकेश दुबे,बापू चौधरी,मेहुल पारेख,घनश्याम परमार आदी सामाजिक युवा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. तसेच स्वच्छता प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक अतुल निकम यांनी मार्गदर्शन केले. नाना पाटील,कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.