जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रोखा

0

निजामपूर। शासनाने 27 फेब्रुवारीला जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या करण्याचा अध्यादेश काढला होता याबाबत निर्णय न्यायप्रविष्ट असून धुळे जिल्ह्यात मराठी व उर्दू प्राथमिक शिक्षकांची 285 पदे रिक्त आहेत ती पदे अगोदर भरण्यात यावीत नंतर बदल्यांचा निर्णय घ्यावा अशी मागणी अल्पसंख्याक विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ताहीर बेग मिरजा यांनी ग्रामीण विकास मंञी पंकजा मुंडे व शिक्षणमत्री विनोद तावड़े यांच्याकडे केली आहे

नुकसानीची जबाबदारी कुणाची?
जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये 260 व उर्दू शाळांमध्ये 25 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत जोपर्यंत ही रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत शासनाने कोणत्याही शिक्षकांची बदली करू नये रिक्त जागेमुळे अनेक मुलाचे शैक्षणिक नुकसान होत आहे याला जवाबदार कोण? , असा प्रश्‍न मिर्झा यांनी प्रशासनाला विचारला आहे. शासनाने सन 2016 मध्ये जिल्हास्तरीय 10 टक्के व 5 टक्के विनंती बदल्या तसेच 10 टक्के प्रशासकीय बदल्या केल्या आहेत 30 टक्के बदल्या मागच्या वर्षात करण्यात आल्या सेवाज्येष्ठतेनुसार अनेक शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत 10 वर्षापेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांचा बदल्या करण्यात येणार आहे पंरतु मागच्या वर्षी ज्या शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत त्याच्या बदल्या यावर्षी पुन्हा होऊ शकतात त्यामुळे 2016 सालात झालेल्या बदल्यांतील शिक्षकांना यंदा वगळयात यावे, असेही त्यांनी या निवेदनात नमूद केलेले आहे.