जळगाव : शासनाच्या विविधि विभागांमध्ये 72 हजार पदे भरण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते, त्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे राज्यभरातील जिल्हा परिषदांना परिपत्रक पाठविण्यात आले आहे. त्यात भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सांगण्यात आले असून येत्या नोव्हेंबरमध्ये जळगाव जिल्हा परिषदेतर्फे भरती प्रक्रियेस प्रारंभ होईल, अशी माहिती सामान्यप्रशासन विभागाचे भा. शि. अकलाडे यांनी दिली. सध्या जिल्हा परिषदेची 2 हजार 131 पदे रिक्त आहेत.
आरोग्य, शिक्षण विभागात जास्त पदे रिक्त
जि.प.च्या कर्मचारी आकृतीबंधानुसार 13 हजार 883 पदे शासनाने मंजुर केली आहे. मात्र सध्यस्थितीत जिपमध्ये वर्ग 3, 4 च्या 11 हजार 752 पदे कार्यरत असुन 2 हजार 131 पदे रिक्त आहे. येत्या डिसेंबरमहीन्यापर्यंत रिक्त जागांची भरतीप्रक्रीया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, रिक्त जागा किती भरल्या जाणार याबाबत अद्याप सूचना नसून साधारणत; 50 टक्के जागा भरल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गट क मध्ये 1973 पदे रिक्त आहेत व गट ड मधील 158 पदे रिक्त असून यावर्षी शासनाने गट ड मधील भरतीला 25 टक्कयांनी कमी केेले. जिल्हा निवड समितीच्या मान्यतेने जि.पची भरती होणार असून यामध्ये भरती प्रक्रीयेसाठी महापोर्टलच्या माध्यमाचा वापर होणार आहे. जिल्हा परिषदेत प्राथमिक शाळेच्या शिक्षकांच्या 742 जागा रिक्त आहे. शिक्षकांच्या आकृतीबंधानुसार 8 हजार पेक्षा अधिक पदे मंजुर असून देखील या रिक्तंजागेंची संख्या दरवर्षी वाढतच असल्याचे सांगण्यात आले. यासह आरोग्य विभागात आरोग्यसेवकांच्या 175 जागा रिक्त आहे, तसेच आरोग्यसेविकांच्या 260 जागा रिक्त आहेत. अर्थ विभागातही कनिष्ठ सहाय्यक लेखाच्या 19 तर वरिष्ठ सहाय्यकांच्या 16 जागा रिक्त असून ग्रामसेवकांच्या 48 व ग्रामविकास अधिकार्यांच्या 8 जागा रिक्त आहेत. जिल्ह्यात गट ब मध्ये येणार्या गटशिक्षणाधिकार्यांच्या 13 जागा रिक्त असल्याने येथेही मोठी पोकळी असल्याने 13 गटशिक्षणाधिकार्यांच्या जागांचा अतिरीक्त भार आहे. केवळ तीनच तालुक्यांना कायमस्वरूपी अधिकारी आहेत.