जिल्हा परीषदेच्या चार सभापतींची आज होणार निवड

0

जळगाव। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडीनंतर चार सभापतींच्या निवडीकडे लक्ष लागून होते. शनिवारी 1 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता होणार्‍या विशेष सभेत सभापतींची निवड होणार आहे. यासाठी भाजपातील इच्छुकांनी सभापतीपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. त्यानुसार आता कुणाच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडते, ते आज दुपारनंतर स्पष्ट होईल. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण, समाज कल्याण,शिक्षण व आरोग्य तसेच कृषी अशा चार सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा होईल. त्यासाठी सकाळी 11 ते 1 पर्यंत नामनिर्देशन अर्ज भरण्यात येतील. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी व शिवसेनेने आघाडी करून प्रत्येकी एक उमेदवार दिला होता. त्यांना 10 मतांनी पराभव स्विकारावा लागला हेाता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकत अल्पमतात असलेल्या भाज़पाला काँग्रेसच्या चार ही सदस्यांनी बिनशर्त पाठींबा दिल्याने सभापतीपदाच्या निवडीत काँग्रेसच्या वाट्याला एक सभापतीपद जाण्याची शक्यता आहे. यात अरूणा पाटील यांना संधी मिळू शकते.

सभापतीसाठी यांची नावे चर्चेत: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यभरात भाजपाच्या उमेदवारात सर्वाधिक 8 हजार मताधिक्याने निवडून आलेले रवींद्र सुर्यभान पाटील यांना एक सभापतीपद मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.त्यांचे वडील सुर्यभान पाटील हे जनसंघापासूनचे कार्यकर्ते आहे. आजपर्यंत जि.प.तील कोणतीही पद न मिळाल्याने त्यांना सभापती पदाचा मान मिळण्याचे चिन्हे आहे. दहीगाव येथील माजी कृषी सभापती सुरेश पाटील यांच्यानंतर या गटाला बर्‍याच वर्षानंतर सभापती पदाचा मान दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव तालुक्यातुन प्रभाकर सोनवणे की लालचंद पाटील तर सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून रावेर लोकसभा मतदार संघाला अधिकचा वाटा मिळण्याची शक्यता भाजपाच्या गटातुन वर्तविली जात आहे. यात साकळीचे रविंद्र सुर्यभान पाटील, आमदार संजय सावकारे यांच्या वहीनी पल्लवी सावकारे, केर्‍हाळा येथील नंदा पाटील, चोपडा तालुक्यातुन ज्योती पाटील यांची नावे चर्चेत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघातुन सभापती पदासाठी लालचंद पाटील, प्रभाकर सोनवणे, पोपट भोळे, अत्तरदे यांच्या पत्नीचीचे नाव चर्चेत आहे.