जिल्हा परीषदेच्या शाळा आता सकाळ सत्रात भरणार

0

उन्हाचा फटका पाहता प्राथ.शिक्षण विभागाचा दिलासादायक निर्णय

भुसावळ- जिल्ह्यातील उन्हाची तीव्रता व ग्रामीण भागात भेडसावणारी पाण्याची समस्या तसेच दहावीची परीक्षा पाहता जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आता 1 मार्चपासून सकाळ सत्रात भरवण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत. सकाळ सत्रात भरणार्‍या शाळा सकाळी 7.30 ते 12.30 या वेळात भरतील तर बाजाराच्या दिवशी शाळांची वेळ साडेसात ते साडेदहा वेळेत भरणार आहे. मधली सुटी अर्ध्या तासांची राहणार असून दोन सत्रात भरणार्‍या शाळांसाठी मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गटशिक्षणाधिकार्‍यांनी आपल्या स्तरावर आदेशाची अंमलबजावणी करावी, असेही आदेशात नमूद आहे.