जिल्हा परीषदेतील सर्व बदली प्रक्रिया पूर्ण

0

जळगाव । जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग वगळता इतर सर्व विभागातील बदली प्रक्रिया 8,9,11 मे रोजी राबविण्यात आली. गुरुवारी 11 रोजी बदली प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता. यावेळी सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभागातील बदली झाली. सामान्य प्रशासन विभागातील 5 पैकी 3 संवर्गातील बदल्या झाल्या. यात वरिष्ठ, कनिष्ठ सहाय्यक, विस्तार अधिकारी सांख्यिकीय यांचा समावेश होता. सामान्य प्रशासन कक्षाधिकारी, ओ.एस. या दोन संवर्गातील बदली मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हजर नसल्याने पुढे ढकलण्यात आली आहे. ह्या बदल्या 15 मे रोजी होणार आहे. कक्षाधिकारी पदाकरीता 3 इच्छुक आहेत. आरोग्य विभागातील बदली प्रक्रिया राबविण्यात आली.