जिल्हा पोलिस अधीक्षकांचे नागरिकांना शांततेचे आवाहन

0

धुळे। नंदुरबारमध्ये सुरु झालेल्या संघर्षाचे लोण धुळ्यात पोहचू नये, यासाठी धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने सतर्क होत ताबडतोबीने पावले उचलली आहेत. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणार्‍या भागांसह धुळ्यातील अनेक भागांमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुख एम. रामकुमार यांनी त्याचबरोबर गस्ती पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

गस्ती पथके शहरभर फिरत असून अफवा पसरविणार्‍यांचा ते कसून शोध घेत आहेत. धुळ्यात सर्वत्र शांतता आहे. अफवा पसरविणार्‍यांवर विश्वास ठेऊ नका, सोशल मीडीयाद्वारे काही समाजकंटक चुकीची माहिती प्रसारीत करु शकतात, त्याकडे लक्ष देऊ नका, असे संदेश फॉरवर्ड करु नका, असे आवाहन पोलिस अधीक्षकांनी धुळेकरांना केले आहे. अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिंमतराव जाधव, एलसीबीचे पोलिस निरीक्षक रमेशसिंह परदेशी, अनिल वडनेरे, दिवानसिंग वसावे, दत्ता पवार यांच्यासह पोलिस पथकासह धुळ्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.