जिल्हा पोलीस मैदानावर 2771 उमेदवारांनी दिली होमगार्ड भरती

0

जळगाव । जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या अधिपत्याखालील पथक-उपपथकातील अनुषेश भरूण काढण्यासाठी महासमादेशन, होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशावरून सोमवारी सकाळपासून होमगार्ड भरती प्रक्रिया घेण्यात आली. यात 2771 उमेदवारांनी भरती प्रक्रीयेत सहभाग नोंदविला असता 932 उमेदवाराच पात्र ठरले असून त्यांची यादी महासमादेशन, होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. दरम्यान, ही भरती प्रक्रीया 615 जागांसाठी घेण्यात आली.

पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरातील पोलिस कवायत मैदानार सोमवारी 615 नविन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात 522 पुरूष व 93 महिला असे होमगार्ड सदस्य नोंदणी म्हणजेच 615 जागांसाठी भरती घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत जिल्ह्याभरातील र हजार 771 पुरूष-महिला उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही तैनात होता. तर अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी भरती प्रक्रिया सुरु होण्याआधी मैदानाची पाहणी करून पोलिस कर्मचार्‍यांना सुचना केल्या होत्या.

सकाळपासून भरती प्रक्रीयेस सुरूवात होवून सर्वप्रथक आलेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी, शारिरीक मापदंडानंतर मैदानावर चाचणी घेण्यात आली. तर पुरूष उमेदवारांसाठी 1800 मिटर धाव चाचणी तर महिला उमेदवारांसाठी 800 मिटर धावणे चाचणी घेण्यात आली. यानंतर धावणे यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची गोळाफेक चाचणी घेण्यात आली. यातच एकूण भरती प्रक्रीया देणार्‍या 2 हजार 771 उमेदवारांपैक 922 पुरूष व 10 महिला पात्र झाले आहे. त्यांची मेरीट यादी तालुकानिहाय तयार करून महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येईल.

होमगार्ड भरती प्रक्रिया ही पोलस अधीक्षक दत्तात्रय कराळे व अपर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी भरतीप्रक्रियेसाठी 2 डिवायएसपी, 5 पोलिस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलिस निरीक्षक, 12 पोलिस उपनिरिक्षक, 16 मंत्रालयीन कर्मचारी व इतर पोलिस कर्मचारी व होमगार्ड कर्मचार्‍यांंचे सहाकार्य लाभले. तर 2 मुंबई होमगार्डसह 315 पोलिस कर्मचारी देखील भरती प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी
सहभागी होते.