जिल्हा बँकाच्या जुन्या नोटा मंगळवारपासून स्वीकारणार?

0

पुणे : जिल्हा बँकांनी स्वीकारलेल्या जुन्या 500 व 1000 च्या नोटा मंगळवारपासून स्वीकारल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापि, याबाबत रिझर्व्ह बँकेकडून अद्याप लेकी सूचना आली नसल्याचे पुणे जिल्हा बँकेकडून जनशक्तिला सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्याच वेळी त्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली होती. त्यात जिल्हा बँकांत जमा झालेल्या जुन्या नोटांबाबत दोन्ही नेत्यांत चर्चा झाली. त्यात जुन्या नोटी स्वीकारण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे येथे सांगितले जाते.

जिल्हा बँकांकडील जुन्या नोेटा स्वीकारण्याचा निर्णय झाल्याचे आम्हालाही समजले आहे. तथापि, याबाबत रिझर्व्ह बँकेकडून आम्हाला कोणत्याही लेखी सूचना आलेल्या नाहीत, असे पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, रिझर्व्ह बँकेचे सर्व नियम सहकारी बँकांनाही लागू आहेत आणि त्याच अटीवर या बँकांना लायसेन्सही मिळाले आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँक अन्य बँका आणि सहकारी बँका, अशा भेद करू शकत नाही. पुणे जिल्हा बँकेच्या व्यवहारांची नाबार्डकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यातही काहीच सापडलेले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला मार्चएंडपूर्वी असा काही निर्णय घ्यावाच लागेल. मात्र, याबाबत अद्याप आम्हाला काहीच लेकी सूचना आलेल्या नाहीत. येत्या आठवड्यात याबाबत काही सूचना मिळतील, असे अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्हा बँकांकडील नोटा स्वीकारल्या जाणार का, याकडे ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.