अमळनेर । नुकताच जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन यांनी शेतकर्यांना रुपी कार्ड वाटपाचा निर्णय घेतला आहे. तो तात्काळ रद्द करावा यासाठी काही शेतकर्यांनी आज उपविभागीय अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक डी.एम. वानखेडे यांना दिले. ग्रामीण भागातील 50 टक्के शेतकरी आजही अशिक्षित आहे.त्यांना रुपी कार्ड हाताळताना मोठ्या चुका होऊ शकतात. ग्रामीण भागात तशी व्यवस्थाही बँकेने केलेली नाही, यासाठी पीक कर्ज पूर्वी प्रमाणे शेतकर्यांच्या बचत खात्यातून करण्यात यावे, असे न झाल्यास सर्व शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही देण्यात आला. या निवेदनाच्या प्रति सहकार राज्य मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी,उपजिल्हाधिकारी यांनाही देण्यात आले आहे.
शेतकर्यांसह विकासो चेअरमन यांची उपस्थिती
शिरूड विकास सोसायटी चेअरमन प्रा.सुभाष पाटील, विकास सोसायटी सडावन बु। चेअरमन निंबा पाटील, सरपंच जिजाबराव पाटील, पांडुरंग पाटील, कंडारी खुर्द विलास पवार, ढेकू सिमचे नाना पाटील, आधार पाटील, धनराज पाटील, कैलास पाटील, सुरेश पाटील, गडखांब विकास सोसायटीचे चेअरमन गोकुळ बोरसे, शिरूड सरपंच बापूराव महाजन ग्रामस्थ पांडुरंग पाटील, किशोर अहिरे, भीमराव पाटील, योजना पाटील, निंभोर येथील कृषिभूषण सुरेश पिरण पाटील, मीराबाई रमेश निकम, मंगरूळ येथील जय प्रकाश पाटील, पप्पू बागुल, खेडी येथील प्रा. श्याम पवार, मुडी येथील गौरव पाटील, झाडी येथील गुणवंत पाटील, पिंपळे खु येथील संजय पणजी पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.