पुणे । पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 120 थकबाकीदार शेतकर्यांना कर्जमुक्त केले असून शेतकर्यांच्या खात्यावर 68 लाख 59 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजयकुमार भोसले यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, दोन शेतकर्यांच्याबाबत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने त्यांचा विषय थांबविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तर नियिमीत कर्ज भरणार्यांना अजूनही कोणत्याही प्रकारचे अनुदान मिळाले नसल्याचे भोसले यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून जिल्हा बँकेच्या 122 लभार्थींना पहिल्या हिरव्या यादीत लाभ देण्यात आला. त्यासाठी 70 लाख 78 हजार रुपये जिल्हा बँकेला देण्यात आले होते. मात्र यादीत असणार्या अडचणी, त्रुटींमुळे या शेतकर्यांना कर्जमुक्त करता आले नव्हते.
बँकेचा शासनाला अहवाल
कर्जमाफी येाजनेचा शुभांरभ करण्यासाठी दिवाळीत पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते जिल्ह्यातील 26 शेतकर्यांना 18 लाख 41 हजार रुपयांची कर्जमुक्ती देण्यात आली. मात्र, ही रक्कम अजूनही बँकेला मिळालेली नाही. दरम्यान, राज्य सरकारकडून एका शेतकर्यांचे नाव कमी करून 122 शेतकर्यांची यादी जिल्हा बँकेला प्राप्त झाली. या शेतकर्यांच्या खात्यावर 68 लाख 59 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. ही प्रकिया बँकेकडून पूर्ण करण्यात आली आहे. विकास सोसायट्यांकडून शेतकर्यांना कर्जमुक्तीचा लाभ दिल्यानंतर त्याचा कार्यपूर्ती अहवाल बँकेकडून शासनाला सादर करण्यात येणार आहे.