जळगाव । जिल्हा बँकेच्या खात्यात पिककर्जाची रक्कम आल्यानंतर किसान डेबिट कार्डद्वारे शेतकर्याने काढले, मात्र पिककर्जाची पुर्ण रक्कम न काढता पाच हजार रूपये कमी असल्याने वारंवार जिल्हा बँकेत तक्रार करूनही कोणतीही दखल न घेतल्याने गुरूवारी तरूण शेतकर्याने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न जिल्हा बँकेत केला. मनोज मन्साराम महाजन (वय-30) रा. एरंडोल असे तरूण शेतकर्याचे नाव आहे.