जिल्हा बँकेसाठी दुपारी बारापर्यंत ५३ टक्के मतदान

 

जळगाव– जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या मतदानास आज सकाळी 8 वाजेपासून सुरूवात झाली. बँकेच्या ९ मतदारसंघातील १० जागांसाठी आज सकाळी मतदान होत असून जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ५३.४५ टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवाई यांनी दिली.

 

जिल्हा बँकेसाठी 21 जागांपैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 10 जागांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात साली असून जिल्हातील मतदान केंद्रावर सकाळीच मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात ५३.४५% टक्के मतदान झाले आहे. मतदानाची प्रक्रिया दुपारी ४ वाजेपर्यंत राहणार आहे.