जिल्हा बँकेसाठी 15 मतदान केंद्र निश्‍चित

10 जागांसाठी 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान

जळगाव – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी दि. 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होणार आहे. यासाठी 15 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी कळविले आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी उमेदवारांकडून मतदारांशी संपर्क साधला जात आहे. मेळावे, कॉर्नर बैठका, घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. या निवडणुकीत भाजपाने बहिष्कार टाकून सर्व उमेदवारांची माघार घेतली आहे. तर महाविकास आघाडीच्या 11 जागा बिनविरोध निश्‍चित झाल्या आहेत. उर्वरीत 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया होणार आहे. दि. 21 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान होईल. यासाठी जिल्ह्यात 15 मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष बिडवई यांनी कळविले आहे.
असे आहेत मतदान केंद्र
जळगाव – सौ. सु.ग. देवकर प्रायमरी स्कूल, जिल्हापेठ, भुसावळ- म्युनिसीपल हायस्कुल, यावल -जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, तहसील कार्यालयाशेजारी, रावेर – सौ. कमलाबाई एस. अगरवाल गर्ल्स हायस्कुल व मुलींचे कनिष्ठ महाविद्यालय, मुक्ताईनगर- जे. ई. स्कूल अ‍ॅन्ड ज्युनियर कॉलेज, बोदवड – जिल्हा परिषद मुलींचा शाळा नं. 1, जामनेर- न्यु इंग्लिश स्कूल, पाचोरा – श्री. गो.से. हायस्कुल, भडगाव – सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय व सौ जयनी गणेश पुर्णपात्री महाविद्यालय, चाळीसगाव – हिरूभाई हिमाभाई पटेल प्राथमिक विद्यालय व अन्नपुर्णाबाई पाटसकर बालक मंदीर, पारोळा – एन.ई.एस. माध्यमिक विद्यालय, अमळनेर – जी. एस. हायस्कुल, चोपडा – कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, धरणगाव – जिल्हा परिषद उच्च माध्यमिक विद्यालय मराठी शाळा आणि एरंडोल – आर.टी. काबरे विद्यालय.