जळगाव – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांनी कोरोनावर मात करून आज सुखरूप घरी परतल्या. यावेळी जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी त्यांचे फुलांची उधळण करून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांना दि. १५ नोव्हेंबर रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या सारा मल्टीसुपर स्पेशालिटी या रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. अॅड. रोहिणी खडसे यांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून मंगळवारी सुटी देण्यात आली. यावेळी त्यांची दोन्ही मुलेही सोबत होती.
मुक्ताई निवासस्थानी स्वागत
कोरोनावर मात करून अॅड. रोहिणी खडसे ह्या जळगाव येथील मुक्ताई निवासस्थानी घरी सुखरूप परतल्या. अॅड. रोहीणी खडसे यांचे आगमन होताच फुलांची उधळण आणि औक्षण करून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अशोक लाडवंजारी, डॉ. अभिषेक पाटील, दिलीप माहेश्वरी, सुनील माळी, अमोल कोल्हे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Next Post