रावेर- प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचीत हवामान आधारीत पीक विमा योजना 2018-19 मध्ये आंबे बहाराकरीता लागू झाली असून त्यामध्ये केळी सारख्या अनेक पिकांचा समावेश आहे. या योजनेमध्ये सहभाग घेण्याची मुदत 31 ऑक्टोंबर 2018 पर्यंत आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा बँकेत पीक विमा स्वीकारला जात नसल्यामुळे जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक नंदकिशोर महाजन यांनी सावदा येथे बँकेचे एम.डी.जितेंद्र देशमुख व प्रकाश चौधरी यांच्याशी चर्चा केल तसेच तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या सुचना केल्या. त्यानुसार ज्या फळ उत्पादकांना विमा घ्यायचा असेल अशा शेतकरी बांधवांनी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या नजीकच्या शाखेमध्ये आवश्यक त्या कागपत्रांची पूर्तता करून रोखीने रक्कम भरणा करून सहभाग आता घेणार आहे. 27 ऑक्टोबरपासून संबंधीत शाखांशी संपर्क साधावा, असे आवाहन बँक प्रशासनाने केले आहे.