जळगाव । नोटबंदीकाळात जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेतुन 73 लाख रुपयांच्या जुन्या नोटा बदलीप्रकरणी सीबीआय मार्फत चौकशी सुरू आहे. यात जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचार्यांचा समावेश आहे. या तिघांची चौकशी सीबीआय चौकशी सुरु असल्याने जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी अस्तिककुमार पांण्डेय यांनी त्यांची बदली केली. सामान्य विभाग कक्षाधिकारी सुनिल सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता नंदु पवार आणि स्थापत्य अभियंता सहाय्यक भुषण तायडे असे बदली झालेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. शुक्रवारी पांण्डेय यांनी बदली प्रकरणावर स्वाक्षरी केली. तिघांची 17 मार्च रोजी मुंबई येथे सीबीआय चौकशी झाल्याने ते सुटीवर होते. सोमवारी जिल्हा परिषदेत हजर होताच त्यांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभाग हे महत्त्वपुर्ण विभाग असल्याने कक्षाधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची महिला व बलाकल्याण विभागात बदली करण्यात आली. पवार यांची चोपडा पंचायत समिती तर भुषण तायडे यांची भुसावळ पंचायत समितीत बदली करण्यात आली आहे.